…. थोडक्यात उत्तरे लिहा …. प्रश्न – आपले नांव सांगा ? उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला. प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ? उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवा प्रश्न – महासागराची नावे लिहा ? उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रे प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ? उत्तर – मेव्हणी प्रश्न – कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ? उत्तर – अमिताभ बच्चन. प्रश्न – उंदीर दुधात पडल्यास काय करावे ? उत्तर – उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी. ………………….. प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ? उत्तर – अर्थाअर्थी अर्थ नसलेल्या अर्थशुन्य अर्थकारनाचा अर्थपूर्ण अर्थसंकल्पाशी अर्थाअर्थी अर्थ जोडून अर्थाचे अनर्थ करण्यात काय अर्थ आहे अर्थमंत्री साहेब? ………………… ….. अपूर्ण गाणी/म्हणी पूर्ण करा. …. प्रश्न – देखा है पहली बार …………… उत्तर – उद्धव के घरमे पवार… कसके पकड़, कसके पकड़. प्रश्न – पाण्यातला मासा झोप घेतो कैसा ………… उत्तर – खावे त्याचा रस्सा तेंव्हा कळे . ………………………… १) प्रकाशवर्षाची व्याख्या करा . उत्तर – अनवाणी पायाने प्रकाश एका वर्षात जेव्हड़े अंतर पायी-पायी चालत जातो त्या अंतरास प्रकाश वर्ष म्हणतात. २) तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा. उत्तर - …….. काय झालं ? …….. बाळ रडत होतं. …….. एक कानशिलात दे त्याच्या. …….. तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते. …. थोडक्यात उत्तरे लिहा …. प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ? उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात. प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ? उत्तर – हप्तावसूली. प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ? उत्तर – ओला होईल. प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ? उत्तर – अभिषेक. प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ? उत्तर – चार. …………………………………………………. प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ? उत्तर – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर, एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते. . …. अपूर्ण वाक्ये पूर्ण करा. …. प्रश्न – पुरुष मोर्च्याचा नारा – हम सब …………… उत्तर – नालायक है. प्रश्न – महिला मोर्च्याचा नारा – हमारी मांगे ………… उत्तर – भरा करो. १) महागाईची व्याख्या करा …. उत्तर – ज्या गायी शरीराने महाकाय असून जास्त चारा खावून कमी दुध देतात त्यांना महागाई म्हणतात. २) इंग्रजी अनुवाद करा.. वीज गेली तर गेलीच गेली. उत्तर – इलेक्ट्रिक वेंट तर वेंटच वेंट. |
निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरू सखा बंधू मायबाप त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप त्याच्या संगतीत फिटतो संदेह वितळतो क्षोभ माया मोह त्याच्या संकीर्तनी मुरविता देह भेटतो उजेड अंतर्बाह्य त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन उजळते जग क्षणकाली स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त पुन्हा मूळ वाट पायाखाली
सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०
…. थोडक्यात उत्तरे लिहा ….
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा