शनिवार, ११ जून, २०११

'पाऊस'

पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

मनांत नसतांना............

मनांत नसतांना............

मनात नसतांना........


मनात नसतांना कुणाला तरी
कधी कधी दुखवावे लागते
उत्तर माहीत नसलेल्या प्रश्नांना
मनात कधीतरी सामोरे जावे लागते.....
मनात नसतांना कुणाला तरी
कधी कधी फसवावे लागते...
दिशा माहीत नसलेल्या वाटसरुला
मिळेल त्या वाटेने जावे लागते!!
हरीत फांदीच्या मनात नसतांना
फुलाला डहाळीवरुन पडावे लागते!!
आणि माणसांच्या मनात नसतांना
कधीतरी जगातुन जावे लागते!!
मनात नसतांना कधीतरी,कोणाच्या तरी
प्रेमात पडावे लागते...आणि.....




प्रेमभंग झाल्यास त्या प्रेमाची आठवण
घेत आयुष्य घालावं लागते!!!


मनांत नसतांना............

माफ करशील का मला

माफ करशील का मला

माफ करशील का मला
मला माहिती आहे
चुक माझीच होती
माझ्यातच ती हिंमत नव्हती
प्रेम केल पण ते निभाऊ नाही शकले
या जगाचा सामना नाही करू शकले
असही नव्हत माझा तुझ्यावर विश्वास नव्हता
पण कदाचित कदाचित मी
स्वतावरच विश्वास नाही ठेऊ शकले
तुला कितीतरी प्रश्न पडले असतील न
मी दिलेली वचने त्या
घेतलेल्या आणाभाका
ती मी दाखवलेली स्वप्ने
सारी खोटी होती की काय
रोजच्या प्रमाणे भेटायला आले खरी
पण हे सांगायला की
तुझी आणि माझी शेवटची भेट
आता तुझी वाट वेगळी
आणि माझी वाट वेगळी
मग इतके दिवस प्रेम केलास
ते फक्त नाटकच होत की काय
तू कधी माझी मजबुरी
समजुन घेशील का रे
तू कधीतरी मला माफ
करू शकशील का रे

मी फ़क्त तुझीच.....!!

मी फ़क्त तुझीच.....!!

मी फ़क्त तुझीच.....!!
तुझ्यावर जेवढ प्रेम केल
तेवढ कोणावरच नाही
पुन्हा कोणावर एवढ प्रेम करेन,
अस आता वाटत नाही...
...
माझ्या आयुष्यात जे तुला स्थान दिल
ते स्थान कोणी कधी मिळवलच नाही
पुन्हा ते स्थान कोणाला मिळेल,
अस आता वाटत नाही...

तुझ्याशी जे नात जोड़ल
ते नात कधी कोणाशी जोडलच नाही
पुन्हा कधी ते जोड़ेन कोणाशी,
अस आता वाटत नाही...

तुला जेवढ सामावून घेतल मी डोळ्यात
तेवढ मी कोणाला पाहिल देखिल नाही
पुन्हा कोण हया डोळ्यात दिसेल,
अस आता वाटत नाही...

जी रह्स्याची दारे तुझ्या समोर उघडली
ती दारे कधी कोणासमोर उघडलीच नाही
पुन्हा ती दारे कधी उघडतील,
अस आता वाटत नाही...

कारण माझ जीवनच एक रहस्य बनलय
ते फ़क्त तुलाच उमगलेल कोड बनुन राहिलय
ते कोड आता माझ्यानेही कधी सुटेल,
अस आता वाटत नाही...

तू माझा राहिला आहेस
अस आता वाटत नाही...
पण तरीही मी फ़क्त तुझीच सुख-राणी आहे
अन कोणा राजाची मी राणी होईन,
अस आता वाटत नाही...

शुक्रवार, १० जून, २०११

आपले आई - वडील वृद्ध होतात .....!"


मनामनातील सुंदर नाती अनेक मने, अनेक जाती निवडण्या

मनामनातील सुंदर नाती अनेक मने, अनेक जाती निवडण्या

 

मनामनातील सुंदर नाती
अनेक मने, अनेक जाती
निवडण्याचे आपुल्या हाती
बोल प्रेमाचे बनवती नाती

कांही नाती ती प्रेमापुरती
असती कांही स्वार्थापुरती
फिरती कांही वासनेभोवती
असती खरी मायेची नाती

म्हणे असती रक्ताची नाती
प्रेम ओलावा त्यात मिळती
पैशासाठी नात्यास मारती
अशी कशी ही रक्ताची नाती?

प्रेम, माया निर्माण करती
मदत जे दुसऱ्यास करती
निस्वार्थपणे नाती जगती
खरे नाते त्यास म्हणती

माझी एक इच्छा आहे...

माझी एक इच्छा आहे...



माझी एक इच्छा आहे...

माझी अंतयात्रा मला पहायची आहे...

पहायचंय मला, कोण रडतंय माझ्या मरणावर?,

अन् पहायचंय कोण हसतंय माझ्या सरणावर?...

पहायचंय मला कोण म्हणतय; "अरेरे गेली...!",

अन् पहायचंय मला कोण म्हणतय; "बरं झालं मेली...!"

आणि हो...

अजुन एक इच्छा ऐका माझी,

मला जाळण्यापूर्वी वाट पहा 'त्याची'...

येईल 'तो' जरुर हे मात्र नक्की आहे,

नाहीच आला तर, स्वर्गात भेट आमची पक्की आहे...

माझ्या तिरडीवर लावू नका फुल-तुरे,

त्याच्या डोळ्यातून निघालेले दोन अश्रुच पुरे....!

माझ्या मृत्युवर नका करू कळवळT,

त्याची सारी प्रेमपत्रे फ़क्त अग्निमध्ये जाळT...

मला अग्नि देता क्षणी तो सुद्धा रडणार आहे,

कारण माझ्यासोबत त्याचे ह्रदय सुद्धा जळणार आहे...

मी मेल्यावरच आमचे प्रेम जगाला कळणार आहे,

कारण तो एक दिवस तरी माझ्यासाठी वैधव्य पत्कारणार आहे...!!

**अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे*** .

**अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे*** .

**अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे***
.
मला सजवण्या मागे, तुमचा काय बेत आहे
माझ्या शरीराचा कोणता, अर्थ अभिप्रेत आहे


फुल होऊन आतास, कुठे मी फुलू पाहतो
कोण चार खांद्यावरुन, मला असं नेत आहे


कधी ज्यांच्यासाठी मी, त्यांचं दूनिया होतो
मला एकटं सोडताना, ते कोणत्या दुनियेत आहे


आजवर प्रत्येकाला, मी आधारच देत आलो
मग माझा भार का, असा लाकडावर येत आहे


ज्यांच्या पोटापाण्यासाठी, मी वणवण फिरलो
माझ्या भोवती फिरून, का तोंडात पाणी टाकत आहे


तेवलो मी त्यांच्यासाठी, प्रकाश मिळावा म्हणून
अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे


मला नाही पटलं माझ्याच आप्तेष्टांचं वागणं
सरणावरून उठलो, तर म्हणे भूतप्रेत आहे


मातीचा लगाव मला, शेवटी मातीतच मिसळलो
थोडाफार जे उरलो, ती राख गंगेत आहे


आठवण माझी येताच, नजर फिरवा आभाळभर
असंख्य रुपात लुकलुकत, मी त्याच्या कवेत आहे


समजू नका मी गेलो, आहे अजून तुमच्यातच
मरणावरच्या प्रत्येक कवितेत, जिवंत भूमिकेत आहे


प्रत्येक जबाबदारी मी, यशस्वी रित्या पार पाडली
माझी जबाबदारी त्यांच्यावर, मी कोणत्या भूमिकेत आहे


जन्मापासून कोणी पुढे, तर कोणी मागे आहे उभं
आज मी एकटाच, मी नक्की कोणत्या रांगेत आहे

हे असा मुलींच्या बाबतीतच का ?

एक छोटीशी कळी मायेच्या कुशीत उमलली 
आईनं परि म्हटलं तिला अन बाबांची झाली ती लाडली

या चिमुकलीच्या येण्यानं सारं घर गजबजून गेलं
कालपर्यंत उंच भासणारं आभाळही आज जणू ठेंगणं वाटू लागलं
हळूहळू चिमणी आता रांगायला लागली
घराची मोठी जागाही आता कमी वाटायला लागली

दिवसभर दंगा करून सारं घर डोक्यावर घायची
स्वतः शांत झोपायची आई बाबांना रात्ररात्र जागवायची
डगमगत का होईना ती चालायला लागली
पण तोल जावून ती पडली तेव्हा जखम आईच्या काळजाला झाली विचारत

आता लाडली हळूहळू बोलायला लागली
ती आधी आई म्हणेन कि बाबा घरात याचीच शर्यत लागली

पण परंपरेनुसार तिनही "आईच" शब्द उच्चारला
बाबा शर्यत हरले पण त्यांनी सहज हसूनच आपला मोठेपणा दाखवला

आता चिमणीच नाव एका शाळेमध्ये घातलं
"आई -बाबा" नाव पाटीवर गिरवण सुरु झालं
येथून पुढे बरेच क्षण आनंदाचे आले
चिमणी मोठी झाली पण तिचे बालपण डोळ्यातच राहिले

सतत जबाबदारीचे ओझे असल्याने बाबांना कधी निवांतपणे बोलणे जमलेच नाही
सकाळी बाबा कामासाठी लवकर निघून जायचे अन घरी आल्यावर
एकच प्रश्न असायचा ......" झोपली का गं ताई ?? "

वेळ कधी थांबत नाही हा तर आहे सृष्टीचाच नियम
लग्न होवून लाडली सासरी निघून जाणार.......
याचीच चिंता वाटायची आई बाबांना कायम

खूप प्रेम लावून आईबाबांनी या कळीचा गुलाब केला
एक राजकुमार येवून तो गुलाब घेवून गेला

आता हि आनंदान भरलेली बाग क्षणभरात रिकामी झाली
लेक सासरी जात असताना आईबाबांच्या डोळ्यांत अश्रूंची धार लागली

आता येथे सारं काही आहे फक्त चिमणीच तेवढी नाही
कधी माहेरी परतणार माझी लाडली सारखी विचारत असते तुझी "आई ".........

संसार

संसार

दोन पाखरांचा संसार होता...
वास्तवात नाही पण तिच्या स्वप्नात होता..

१४ फेब्रुवारी ला लग्न...
आणि व्हायचा विचार होता..

लग्नानंतर रोज एक चोकलेट..
आणि रोज बाहेर फिरायला जायचं असा तिचा हटट होता..

आपले चौघांचे कुटुंब असेल..
मोठी कृपा तर छोटा पार्थ असेल...

दर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट डिनर..
तिथे आपल्या दोघं शिवाय आणखी कुणी नसेल..

आपल्या दोघांच छोटस घर असेल..
गुलाबी भिंती आणि मार्बल फ्लोर असेल..

कृपा ला डॉक्टर आणि पार्थ ला स्पोर्टसमन बनवायचे...
आणि आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे....

आमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र लागली...
आमच्या स्वप्नाची नाव नशिबाच्या सागरात बूडू लागली..

त्या बुडणाऱ्या नावेकडे बघन्यावाचून कोणताच पर्याय नव्हता...
घात करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे नाव घेत नव्हत्या...

शेवटी स्वप्नांची ती नाव बूडून गेली...
पाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन गेली..

स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती...
आता कधी जिव निघून जातो ह्याकडे नज़र लागली होती.

" हो ..... मलाही ! "

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! "

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग असतो.

तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.

तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.


एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''

""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.'' 

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस...  यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''


वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.

आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.

दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.

आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा. 
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल....


कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...

कधीतरी तू मला असं वचन देशील?
पूढच्या जन्मी तरी माझा होशील?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो यातच मग मला समाधान असेल...

गोड गोंडस हळव्या मनाची एक परी कुठेतरी हरवलीय माझी

 
गोड गोंडस हळव्या मनाची
एक परी कुठेतरी हरवलीय माझी
लाउन जिव कशी नकळत जायची
लहान मुलीसारखी अगदी निरागस हसायची
चिडायची कधीकधी, अगदी मुळुमुळु रडायची
काही बोललो मी तर कधी लटके लटकेच रागवायची
माझी गोंडस परी माझ्यावर भरपुर प्रेम करायची

जगायची माझ्यासाठीच अगदी मनामद्ये बसवायची
स्वतःचे अश्रु लपवुन ठेवुन माझे डोळे पुसायची
बोलायची मरेन तुझ्याशिवाय कदाचीत
राहीन रे नेहमीच सोबत तुझ्या
नजरेआड गेलो जरा की अस्वस्थ व्ह्यायची
सापडलो नाही मी की ति वेड्यासारखी व्हायची
ऐकायची गोष्ठी अगदी लहान मुलीसारख्या
माझ्यासाठी रात्र रात्र जागायची
माझी गोंडस परी माझ्यावर भरपुर प्रेम करायची

काय जाणे काय झाले?
माझी परी कुठेतरी हरवली
मला एकटा सोडुन गेली कुठे जाऊन लपली
आता शोधतोय फक्त तिच्या पाऊलखुणा
शब्दही तिचेच होते,भावनाही तिच्याच होत्या
भावनांतुन बनलेल्या कविताही तिच्याच होत्या
मी कुठेच नव्हतो मी होतो "निमीत्तमात्र"...............

कॅप्शन जोडा
आई अगदी आठवड्याच्या गर्भापासून ते नऊ महिन्यापर्यंत
तू माझी काळजी घेतली होतीस.
तुज्या उदरांत असतांना तु माझ्यावर गर्भ संस्कार केलेस
उदरावर हात फिरवत तु " बाळा लवकर ये रे " म्हणत मला गोंजारलेस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

अनंत यातना भोगून तू मला जन्म दिलास
सर्व वेदना विसरून तू मला कुशीत घेतलेस
मी डोळे किलकिले करून मोठ्याने रडू लागलो
आणि तू लगेच मला पदराआड घेवून अमृत तुल्य स्तनपान दिलेस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

मला नजर लागू नये म्हणून तू
नेहमी मला काळी तीट लावयचीस
मला जरा काही झाले तर तू कासावीस व्हायचीस
माझा प्रत्येक हट्ट तू बाबांशी भांडून पूरवायचीस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

मी तुझा हात धरून मी माझे
पहिले दुडू दुडू पाऊल टाकू लागलो
आणि तू आनंदाने टाळ्या वाजवू लागली
मी ही बोबड्या स्वरांत " माझी आई " म्हणत तुला मिठी मारली

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई त्या मिठीत खरंच परमेश्वरी सुख आहे
तुझ्या पोटी जन्म घेणे हा माझा दैवयोग आहे
जगण्याचे धाडस, स्वाभिमान, कणखरपणा
ह्या सर्व गोष्टींचे बाळकडू तू मला दिलेस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

बाबांच्या तुटपुंज्या पगारामुळे घरखर्चासाठी
तू पण कष्ट करून लागली
माझा बाळाला काही कमी पडू नये म्हणून
नेहमी उपाशी राहून प्रेमाचा घास भरवू लागली

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

मला आठवतंय श्यामची आई चित्रपट पाहतांना
तू माझाकडे पाहत अश्रू ढाळत होतीस
आई मी तुझा श्याम नाही होवू शकलो पण
तू माझ्यासाठी श्यामच्या आई पेक्ष्याही श्रेष्ठ होतीस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

मला झोप लागावी म्हणून तू नेहमी
तुझ्या हाताची झोळी कळ लागेपर्यंत झुलवायची
मांडीवर थोपटत गोड अंगाई गीत ऐकता
मला किती छान झोप लागायची

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई मी इतका मोठा झालो तरी
तुझ्या कुशीत, मांडीवर डोके ठेवले की
माझे सर्व व्याप, कटकटी विसरतो
केसांवरून फिरणारा तूजा दैवी स्पर्श हवाहवासा वाटतो

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई अजूनही वाटते की तुझ्या मांडीवर डोके ठेवून
तुझ्या गोड गळ्यातील अंगाई गीत ऐकावे
तू मुलायम हाताने थोपटत रहावे
परत एकदा तुझे दुडू दुडू धावणारे बाळ व्हावे

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई तुझे हे बाळ कितीही मोठे झाले तरी
ठेंच लागताच "आई गं ! " हीच किंकाळी ओठांतून निघते
एकाकी, आजारपणात कोणी जवळ नसले तर
मला तूच जवळ असावी असे वाटते

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई आज माझ्याकडे सर्व आहे पैसा , सुख
पण परदेशात तू माझ्या जवळ नाहीस
आई तू मला इतका मोठा केले आहेस
पण तुझ्या प्रेमापासून पोरकेही केले आहेस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

कधी एकदा येवून तुला डोळे भरून पाहीन
तुझ्या चरणांना स्पर्श करून कुशीत विसावेन
आई खरं सांगू " हे सर्व सुख जवळ असून मी
तुझ्याविना भिकारी आहे गं ! भिकारी आहे !!

--

मागे वळून पाहता.........

मरण मला पाहून हंसले
मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता
असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून तो गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील
खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम
जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य......

गारवा

गारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये नभात ही चांदवा नवा नवा

गवतात गाणे झूलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये मनात ही ताजवा नवा नवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा

भिजलेल्या भूतकाळानी भिजलं... भविष्य...

माझी एक जुनीच कविता...

--------------------------------------

भिजली नदी, भिजले तळे.,
भिजलेल्या आठवणींनी भिजले डोळे...

भिजलं शेत, भिजले मळे.,
भिजलेल्या आठवांचे आज भिजले सोहळे...
..
..
..
भिजली सर, भिजले थेंब.,
भिजलेल्या भावनांमध्ये भिजलं प्रेम...

भिजलं फूल, भिजली पाकळी.,
भिजलेल्या कपाळावर भिजली टिकली...

भिजली लाट, भिजली होडी.,
भिजलेल्या ओठांची भिजली गोडी...

भिजलं पान, भिजली कळी.,
भिजलेल्या गालावर भिजली खळी...

भिजलं गाणं , भिजली शिळ.,
भिजलेल्या हनुवटीवर भिजलं तीळ...

भिजलं रान, भिजले वृक्ष.,
भिजलेल्या ओंजळीत भिजले स्पर्श...

भिजली रात्र, भिजल्या चांदण्या.,
भिजलेल्या नयनांच्या भिजल्या पापण्या...
..
..
..
भिजलं वादळ, भिजले वारे.,
भिजलेल्या विरहात भिजले अंतरे...

भिजलं रक्त, भिजला काटा.,
भिजलेल्या पाऊलांनी भिजल्या पाउलवाटा...

भिजलं आभाळ, भिजले घन.,
भिजलेल्या स्मृतींमध्ये भिजलं मन...

भिजलं जीवन, भिजलं आयुष्य.,
भिजलेल्या भूतकाळानी भिजलं... भविष्य...

जलधारा

जलधारा

जलधारा
रिमझिम ह्या जलधारांवरती
मधुर त्या लहरींवरती
रानपाखरे नाचत होती
विसरुन देह भान रिती..........

गवतावरचे थेंब टपोरे
मातीतुन गंध दरवळे
स्रुष्टीचे चैतन्य आगळे
पानाफ़ुलांवर फ़ुलले...............

क्षणात मेघ बरसुनी जाती
वसुंधरा हिरवी होती
उन-पाउस खेळ खेळ्ती
श्रावणात या सरींवरती............

बघुन ही सारी अवनी
मनास वाटे जावे भिजुनी
जलधारांच्या तालांवरती
तनमन चिंब होउन सजणी

आलाय पाऊस…..भिजून घ्या

आलाय पाऊस…..भिजून घ्या

पाऊस आलाय….भिजून घ्या
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या.............

एक विनंती आहे.....

एक विनंती आहे..... दुरच जायच असेल तर जवळच येऊ नका,
busy आहे सांगुन टाळायचच असेल तर वेळच देऊ नका..

एक विनंती आहे..... साथ सोडून जायचच असेल तर हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर मनात आधी भरूच नका..

एक विनंती आहे...... चौकशी भरे call काळजी वाहू sms यांचा कंटाळाच येणार असेल तर कोणाला
नंबर च देऊ नका, memory full झालिये सांगुन delet च करायचा असेल तर नंबर save च करू नका.

एक विनंती आहे..... मौनव्रत स्वीकारायच असेल तर आधी गोड गोड बोलूच नका ,
secrets share करायचीच नसतील तर मनाच दार उघडूच नका.....

ती एकदा आजीला म्हणाली

ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं............

मेघमल्हाराची सुरू झाली तयारी.........

मेघमल्हाराची सुरू झाली तयारी.........
मेघमल्हाराची सुरू झाली तयारी।
नभी सजली आज एक सभा भारी।

छेडण्या गगनी जलस्वरांची तार।
एक एक ढग आज आतुर फ़ार॥

आणि मग सुरु जाहला तो सोहळा अनुपम।
असंख्य जलथेंबांचे घुंगरू निनादती छमछम॥

नभोमंडपी वीज नर्तकी करी थय थय थैमान।
ढगही धरती एक सुंदर तान,वाऱ्याची बासरी बेभान॥

प्रेक्षक वृक्ष या तालावर डोलती।
या सोहळ्याचे सुंदर गाणे तेही मनात बोलती॥

मग धावुनी आला तो मयुर नर्तक।
वनी ताल धरी, करी सुंदर कथ्थक॥

वसुंधराही या धारानी जाहली आज तृप्त।
प्रत्येकाच्याच मनाची पूर्ण झाली अभिलाषा एक सुप्त॥

शेवटी इंद्रधनुने होई सोहळ्याची सांगता।
काय सांगु ते दृश्य मज न ये वानता॥

ज्याने पाहिला हा सोहळा देखणा।
त्यासी वाटला स्वर्ग ही पुरता उणा॥

मुलीचें जिवन हे असचं असतं

मुलीचें जिवन हे असचं असतं
मुलीचें जिवन हे असचं असतं

मुलीचें जिवन हे असंच असतं

तुझं आनि तिच सारखंच असतं

ज्या कुटुंबात वाढुन मोठे व्हायचं असतं

त्याच कुटुंबाला सोडून जायचं असतं

ज्याने आईचे बोट धरून चालण शिकायचं असतं

त्याच बोटाने कुंकू लावून निघायचं असतं

ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळून मोठ व्हायचं असतं

त्याच खांद्यावर डोकं ठेवून रडायचं असतं

ज्या बहीण भावाला भांडून रड्वायचं असतं

त्यांनाच सोडून जाताना रडायचं ही असतं

सासूराला जाताजाता उंबरठ्या मधे

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामधे...

तू मुलगी आहेस म्हणून का

तू मुलगी आहेस म्हणून का
तू मुलगी आहेस म्हणून का
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारायचा?
तुझ्या येण्याने ह्या जगात
होणार्या आनंदाला आम्ही मुकायचं?

अगं.... आजची तू माझी कन्या
माझ्या उद्याच्या नातवांची आई
काय सांगावं कदाचित उद्याच्या
सुपर हीरोज ची असशील तू आई

राम,कृष्ण, पैगम्बर अन येशु
शिवाजी, गांधीजी की असो इंदिराजी
सगळ्या सगळ्याना एक आई होतीच की
नसतं तिला जन्मू दिलं आम्ही ....
तर इतिहास घडायची शक्यताच नव्हती...

इतिहास आम्हालाही घडवायाचा आहे
आणि घडवायाला तो इतिहास
एक माय प्रसवाविच लागणार आहे....
उद्याच्या स्रुजनाकरिता की...
उद्याच्या जगाला जगवायालाही ....
आम्हाला माय ही लागणारच आहे

म्हणून ...आणि म्हणुनच....
तू मुलगी आहेस म्हणून
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारणार नाही

ह्या जगाला जगवण्या साठी
मायेची पखरण करण्या साठी
नव निर्मितीच्या सृजना साठी
तू ये... तू ये .. तू ये..
बालिका तू आजची
माता अनंत कालाची ....

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

असं प्रेम करावं...!!!



थोडं सांगावं थोडं लपवावं,

असं प्रेम करावं

थोडं रुसावं थोडं हसावं,

असं प्रेम करावं

गुपचुप फोन वर बोलावं,

कोणाची नाज़र पडताच पटकन ""अरे चा "अगं" करावं

असं प्रेम करावं


जग पुढे चाललं असलं

तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,

फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,

आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,

असं प्रेम करावं




कुठे भेटायला बोलवावं,

पण आपण मात्र उशिरा जावं

मग आपणच जाऊन sorry म्हणावं,

असं प्रेम करावं


वर वर तिच्या भोळसट पनाची,

खूप चेष्टा करावी,

पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,

असं प्रेम करावं


प्रेम ही एक सुंदर भावना,

हे ज़रूर जाणावं,

पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं

असं प्रेम करावं



विरह येतील, संकट ओढवतील,

प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,

पण आपण मात्र खंबीर रहावं,

असं प्रेम करावं



एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,

म्हणूनच जीवापाड जपावं,


असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं ...



असं प्रेम करावं...!!!

तुजवीण सख्या रे ......

पावसाची गुंज
पाखरांची कुजबुज
का ऐकू येत नाही
सावलीची अलगुज
...रीता आहे वारा
गंध वेडा तो नाही
सूर तेच तरीही
रास रंगला नाही
आस तुझी,
ध्यास तुझा,
भेटशील ना रे ....
आस तुझी,
ध्यास तुझा ,
भेटशील ना रे ....
स्वप्न राहील अपुले
तुजवीण सख्या रे
तुजवीण सख्या रे
तुजवीण सख्या रे ..

आई

आई
आई आहे ईश्वराच्या आधी
पवित्र जगाची या निर्माती
म्हणून झुकतो तिचा निर्माता
ईश्वरही तिच्या चरणावरती

आई प्रेमळ प्रतिबिंब छान
प्रेम जगाला देणारी ती
प्रेमाचीच मग शोभावी एक
छान प्रेमळच परिभाषा ती

आई आहे शब्द पहिला
बाळ नेहमी जो उच्चारतो
मायबोलीत आईच्या त्या
बोलायला तो जसा लागतो

आई जगती गुरु प्रथमच
जन्म घेणाऱ्या जीवाचा ती
म्हणून जगी सारे म्हणती
आई आहे गुरु थोर ती

आई आहे एक गोड नात
म्हणून म्हणते मला बाळ ती
जीवाचे मोल देऊन तिच्या
रक्षण माझे करते मग ती

आई ....!!!!!

सोमवार, २४ जानेवारी, २०११

सावल्या...

मिट्ट काळोखात होत्या गूढ काही सावल्या
भूतकाळातील पापांच्या उशाशी सावल्या

जागतो सैतान देही आज कोणा पाहुनी
चेहऱ्याला नाव होते, या निनावी सावल्या

गाडले होतेस ज्यांना खोल तू अपुल्या मनी
त्या भुतांच्या खेळती आता जिवाशी सावल्या

जोडले नाते तनुशी कालपावेतो जरी
या निघाल्या आज करण्या बेइमानी सावल्या

जीवनाचे सत्त्व सारे शोषले जळवांपरी
जीव माझा घेउनीही का उपाशी सावल्या

काय तृप्तीच्या बढाया मारता माझ्यापुढे
पोटभरल्या माणसांच्याही अधाशी सावल्या

शाप त्यांना, सांग, कोणी हा विदेहाचा दिला
मांडती दावा उभा बघ इंद्रियांशी सावल्या

सुविचार


* आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

* जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

* ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

* यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

* मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

* प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

* अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

* आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

* निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

* खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

* सत्याने मिळतं तेच टिकतं.

* जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

कधी कधी असंच....!!!

एकमेकांच्या नजरेत,
एकमेकांना शोधायचं ;
भेटल्यावर पुन्हा,
एकमेकांत हरवुन जायचं ;
नातं मनाचं मनाशी, असंच फुलवायचं १

एकमेकांना भेटण्यासाठी,
आतुर असायचं ;
स्वप्नातही एकमेकांच्या
सोबत रहायचं ;
नातं मनाचं मनाशी, असंच फुलवायचं २

कधी कधी असंच,
लटकं लटकं रागवायचं ;
कधी कधी असंच,
खोटं खोटं भांडायचं ;
नातं मनाचं मनाशी, असंच फुलवायचं ३

स्वत:साठी जगणं,
विसरुन जायचं ;
एकमेकांनी एकमेकांशी,
एकरुप होवुन जायचं ;
नातं मनाचं मनाशी, असंच फुलवायचं ४
मनाच्या खोल गाभार्‍यात, हळुवार जपायचं.

बुधवार, १९ जानेवारी, २०११

खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते?....

एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,
प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?
प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.

प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाही
सांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे?
प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पण
तु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.

प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द काय
करणार... छे! :(
माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्या
सौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(

प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेम
करतो ...

- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस
- तुझा आवाज खूप गोड आहे.
- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...
- तु खूप सुंदर विचार करतेस
- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..
- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)

प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.

काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानक
अपघात होतो आणि ती कोमात जाते.

प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेले
असते,

प्रिये,

तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.
पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.

तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करत
होतो.
पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावर
प्रेम नाही करू शकत.

जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेम
करावे असे तुझ्यात काहीच नाही.


खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते?....

"प्रेम म्हणजे ................ खरं प्रेम सुरू होतं लग्नानंतर !


खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां होते जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात- मनाने, शरिराने! कायमचे..!!
खरं प्रेम म्हणजे दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.
खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे.
खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे शेवटच्......??????????

प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.....


प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी
ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ....................

जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे
मनाला जाणवलं तेव्हा हे हसणार मन
दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत
कदाचित दोघानाही सांगायचे होते काही
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

जे जमले नाही मला या जन्मी
कदाचित मिळविण मी तुला पुढच्या
जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या
जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला
खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

मंगळवार, ११ जानेवारी, २०११

चारोळी - Charoli


चारोळी - Charoli दाखवून गत वर्षाला पाठ,
चाले भविष्याची वाट....
करुन नव्या नवरीसारखा थाट,
आली ही सोनेरी पहाट ! :)

चारोळी - Charoli गेलं ते वर्ष,
गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून...
आले २०११ साल. :)

चारोळी - Charoli प्रिये,
चल या नवीन वर्षाचे
स्वागत करूया....
जुन्या स्वप्नाना,
नव्याने फुलवूया !! :)

चारोळी - Charoli प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे, :P
जखमा दिसत नसल्यातरी
वेदना फार आहे! :(

चारोळी - Charoli अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस??
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन..
तु माझ्या कडे का मागतेस ;) :)

चारोळी - Charoli जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत!
कारण मागितलेला स्वार्थ..
अन दिलेलं प्रेम असतं .... :-)

चारोळी - Charoli नजरेत जे सामर्थ्य आहे...
ते शब्दांना कसे मिळणार? :)
पण प्रेमात पडल्याशिवाय..
ते तुम्हाला कस कळणार? ;) :P

चारोळी - Charoli शब्दांनाहि कोड पडावं...
अशीही काही माणस असतात !! :)
किती आपलं भाग्य असत,
जेव्हा ती आपली असतात... ;) :)

चारोळी - Charoli चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस, :)
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस! ;)

चारोळी - Charoli कांद्याच्या भावाने,
त्रासली जनता..
नव वर्षात होवो,
सर्व दुखाःची सांगता !!! :)

चारोळी - Charoli मी तुझ्याबरोबर खेळतो,
तेच मुळी हरण्यासाठी.. ;)
तुझ्या गालावरल्या खळीत,
हसु भरण्यासाठी !!! :)

चारोळी - Charoli तु इतकी सुंदर आहेस की,
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल.. :)
खुप भाग्यवान ठरेल तो,
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल! ;)

चारोळी - Charoli


चारोळी - Charoli राहून राहून मलाही वाटत
आपलही कुणीतरी असाव..
जिच्यासाठी आपण आपल
सर्वस्व अर्पण कराव ..:)

चारोळी - Charoli गालावरची खळी पड़ते..
डोळ्यात तुजे स्वप्न रंगवतो..:)
का बर असा मी.......
स्वताला तुझ्यात गुंतवतो. ;)

चारोळी - Charoli तुझ्याशिवाय मनात,
कोणा मुलीचा विचार असणार नाही, ;-)
तुझ्याशिवाय तसे मला,
फुकटचे कोणी पोसणार नाही........:-P :-D :-D

चारोळी - Charoli क्षणभराची भेट तुझी..
त्यात खूप काही बोलणं..:)
कसं शक्‍य आहे..?
असंख्य चांदण्या मोजणं......;)

चारोळी - Charoli तुझ्या आठवणित मी,
स्वताला ही विसरतो ... :)
हळव होत "मन" प्रत्येक वेळी,
जेव्हा विषय तुझा येतो..... ♥

चारोळी - Charoli शोधू नकोस ग राणी ,
माझ्याजवळील मोरपीस सप्तरंगी :)
नकळत ढापल ग ते....
एका पोरीने अतरंगी ... ;) :D :D
hehehe

चारोळी - Charoli जेव्हा जेव्हा तू मला भेटतेस,
अधिकाधिक आवडतेस, :)
नजरेच्या वाटेने..
मनात खोलवर उतरतेस ;)

चारोळी - Charoli खूप नाती जुळतील तुझ्या जीवनात ,
जशी झाडांची फुले पडतात अंगणात ,
खूप मित्र मैत्रिणी भेंटतील जीवनात ,
जशे थव्याने पक्षी उडतात आकाशात ,
आयुष्याच्या या रंगीन खेळात ........
......
...
...
...
मला थोडी जागा ठेव "तुझ्या हृदयात" ♥ :)
See More
चारोळी - Charoli नंतर जाणिव झाली
मी तुझा कुणीच नव्हतो
आपलं नातं एका वाटसरूचं होतं,
कांही काळ सोबत होतो....... ;(

चारोळी - Charoli तू जेव्हा चुक केलिस
मी तुला माफ केल!!
मी जेव्हा चुक केली
तू म्हणालिस पाप केल..:(

चारोळी - Charoli तुझं त् गोड स्मित हास्य
आज ही मला वाकुल्या दाखवतंय
तू माझी झाली नाहीस
याची जाणीव करून देतंय !!

चारोळी - Charoli त्या वळणावर मी तुला
पुन्हा वळून पाहिले..
काय करू तुला पहिल्या शिवाय
नाही राहवले..

चारोळी - Charoli अलगद धरलेला हात तू....
अलगदच सोडला होतास..:(
आणि स्वप्नात बांधलेला संसार,
तू अलगदच मोडला होतास.. ;`(

चारोळी - Charoli आजही माझी सकाळ,
तुझे नाव घेऊन होते.. :)
आणि तुझ्याच स्वप्नांमध्ये,
माझी सर्व रात्र जाते. ;)

चारोळी - Charoli अजुन तरी काहीच नव्हते..
तुझे माझे म्हणण्या जोगे..
सर्व काही आपले होते..
एकत्र प्रेम करण्या जोगे...

चारोळी - Charoli डबडबलेल्या आसवानां बाहेर येण्यासाठी
पापण्या मिटाव्या लागतात........ :(
ते अश्रु टीपण्यासाठी...
प्रेमळ हाथच असावे लागतात...:`(

चारोळी - Charoli मनाला घोर लावणार्या गोष्टि,
तु मात्र करु नकोस... :(
मी नसलो तर काय झालं?
तु मात्र हरु नकोस...........

चारोळी - Charoli पहिली सोडली,
अन दुसरी धरली... :)
जवळ गेल्यावर मग...
ति कचकन चावली... ;) :-D :-D