शनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०

'मजेत आहे मी'

काहीतरी गंमतीशीर बोलत रहावे

मनातले कढ दडविण्यासाठी
बोलता बोलता हलकेच पुसुन घ्यावे
..घोटाळणारे जळ पापणीकाठी!
खळखळुन हसावे, अडवुन
ओठांवरची ती विरह-गाणी
अंतरातल्या धगधगत्या दु:खावर
...आपणच ओतावे पाणी!
'मजेत आहे मी' म्हणत जावे
होत नसले जरी काही मनासारखे
येणारे दिवस हसुन साजरे करावेत
..महीनाअखेर येणा-या सणासारखे!
कैक ऋतु निघुन जातात
दिवस असे सरता-सरता
शिकुन घ्यावे सरण आपले
... असेच रचता-रचता!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा