आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळख करुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
म्हणून तर माझी आज ओळख आहे
पण हे सर्वे सदगुरु कृपेने मला मिळाले .
कधीतरी असेही जगून बघा.....
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठी......!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा