जाणिव झाली आहे मला हि आता
नाही त्या वाटांवर पुन्हां जायचं,
या मनाला आता तुझ्यामुळे
नाही पुन्हां पुन्हां दुखवायचं.
मनाने घेतलेल्या निर्णयावर
आता सतत ठाम रहायचं,
काटेरी वळणांपासून त्या
स्वत:ला नेहमी दूरच ठेवायचं.
तु दिलेल्या त्या जखमांतूनही
आता नविन काहीतरी शिकायचं,
तुझ्या त्या सर्व आठवणी विसरून
एक नविन आयुष्य उभं करायचं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा