रेशमीचे बंध, मी छाटून आले
वेदनेची लाट, मी आटून आले
भोगले जे दु:ख, त्याला सोबतीनेवंचनेची साथ, मी थाटून आले
रात सोसूनी, फुलांच्या चिंब नेत्री
त्या दवाचे थेंब, मी चाटून आले
संपली रात्र, सखा आला तरूनीकापराचे प्रेम, मी वाटून आले
ही तुझी, साधी कहानी ठीक आहे
माझीया डोळ्यात, मी दाटून आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा