त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?
जीवनी संजिवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?
निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरू सखा बंधू मायबाप त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप त्याच्या संगतीत फिटतो संदेह वितळतो क्षोभ माया मोह त्याच्या संकीर्तनी मुरविता देह भेटतो उजेड अंतर्बाह्य त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन उजळते जग क्षणकाली स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त पुन्हा मूळ वाट पायाखाली
सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०
सांग तू आहेस का ?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा