मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

धुंद एकांत हा..!!!

धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडीता, तार झंकारली
जाण नाही मला,प्रीत आकारली
सहज तू छेडीता, तार झंकारली

गंधवेडी कुणी, लाजरी बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीपरी
यौवनाने तिला आज शृंगारली



गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली

रोमरोमांतूनी गीत मी गायिले
दाट होता धुके, स्वप्न मी पाहीले
पाहता पाहता रात्र अंधारली
आज बाहूत या लाज आधारली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा