माणसाला बनवताना मन का दिलेस?
सगळं साठवण्याची कुवत का दिलीस?
टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही
मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास
आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात...
न कळते तर बरं झालं असतं....
आता केलीस ती चूक केलीस
पुन्हा मात्र चुकू नकोस.....
माणसासारखा बनू नकोस....
माणूस काय...... मुखवटाधारी
काय खरे काय खोटे कैसे समजावे म्या पामरी
मला वाटत तुला सुद्धा प्रश्न पडत असेल कधीतरी ,
की ज्याला निर्मिला मी ,तो मानव आहे का 'तोच ' तरी?
पुढच्या वेळेला सृष्टी निर्मिताना हे सार लक्षात ठेव....
काहीच innovative नाही जमल तर मन , भावना , हे "parts " manufacture करताना असले फौल्ट्स बाजुला ठेव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा