सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

नेटवरून फिरणारा हा इ-मेल

नेटवरून फिरणारा हा इ-मेल




- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल. त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे. 

- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल. तुझ्याएवढाच पगार कमावत असेल. 

- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील, 

- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं... 

- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच! 

- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील, 

- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल. 

- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल, 

- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल. 

- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल, 

- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल, 

- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल. 

- नोकर, स्वयंपाकी, बायको... यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही... 

- आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील... 

- तीसुद्धा थकते, कंटाळते... 

- पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात. 

- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही... तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते. 

- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही. 

- स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल. तू मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल. 

- या अनोळखी घरात केवळ तू एकच तिच्या ओळखीचा, जवळचा आहेस, त्यामुळे तुझी मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं, अशी तिची अपेक्षा असेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा