सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

प्रेमा तुझा रंग कसा...!!!

प्रेमा तुझा रंग कसा', या वाक्याचा अर्थ आपल्याला सभोवताली हातात हात घेऊन हिंडणार्‍या...किंवा एकमेकांच्या बाहूपाशात हरवलेल्या...किंवा एखाद्या समुद्रकिनारी एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या 'कपल्स'कडे पाहिल्यानंतर कळतो. प्रेमाचा रंग तसा गुलाबी! पण, तो अचानक कसा बदलेल, याचा मात्र काही नेम नाही. तो रंग बदलवणारे आपणच असतो. प्रेमामध्ये आपल्या मनाविरूध्द होत असेल तर एकदम 'नाही' कसं म्हणायचं? म्हणून...मन इथे कच खाते.
.
.
खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना.
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.
बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे.
तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.
प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.
आणि शेवटी..
ज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात ते त्याच्यासमोर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा